तुटलेल्या पारंब्या

  • 3.1k
  • 1.1k

तुटलेल्या पारंब्या - नागेश पदमन. --------------------------------------------------------------मोबाईल कर्कश्श आवाजात केकाटायला लागतो. पहाटेचे चार वाजलेले असतात. मी अलार्म बंद करतो. बायकोला उठवतो. ती लगबगीने उठते. आंघोळ करुन स्वयंपाकाला लागते. पाचला कुकरची पहिली शिट्टी होते. किचन कट्ट्यावर ठेवलेला चहा संपवून मी नानुला आवाज देतो. तो फक्त या कुशीवरून त्या कुशीवर वळतो. सवापाचला बाथरूम मधून बाहेर पडून मी नानूला हाताला धरून उठवतो. तो डोळे चोळत कुरकुरत बाथरूम मध्ये घुसतो. साडेपाचला तो बाथरूम मधून बाहेर पडेपर्यंत माझी ऑफिसची बॅग आणि त्याचं दुसरीच दप्तर मी तयार केलेलं असतं.. किचन कट्ट्यावर तिघांचे तीन टिफीन तयार असतात. ज्याचे त्याचे टिफीन ज्याच्या त्याच्या बॅग मध्ये मी कोंबतो. मी शुजमध्ये