जोसेफाईन - 8

  • 3.4k
  • 1.8k

सुमित ने श्वेता ला बोलण्यात गुंतवण्याचा प्रयत्न केला पण श्वेता च्या मनातून ती पंख्याला लटकलेली बाई काही जाऊ शकली नाही.रात्री सगळ्यांचे गप्पा मारत मारत जेवणं आटोपले. आत्या आणि श्वेता गेस्ट रूम मध्ये झोपल्या. सुमित-सुपर्णा सुद्धा त्यांच्या खोलीत झोपायला निघून गेले.श्वेता ला बराच वेळ झोप लागली नाही. आत्या मात्र गाढ झोपल्या. श्वेता चे बाळ सुद्धा झोपी गेले. अखेर रात्री बाराच्या पुढे श्वेता चा डोळा लागला.साधारण एखाद्या तासाने श्वेताला कोणीतरी कानाशी पुटपुटतेय असं वाटलं आणि त्याच्या पाठोपाठ तिला अत्यंत घाणेरडा वास आला. तिने डोळे किलकीले करून पाहिले तर तिचे डोळे उघडे ते उघडेच राहिले. कारण एक बटबटीत काजळ लावलेली टकली बाई श्वेता