आई - माझी माऊली सुखाची सावली

  • 2.8k
  • 837

आई... किती गं तुझी थोर महती तुझ्या बद्दल लिहिताना शब्दही अपुरे पडती आई... कोणी केली गं तुझी अशी निर्मिती आम्हा लेकरांची माय जणू वात्सल्याची मूर्ती आई... स्वर्गाहून ही सुंदर तुझे निरागस रूप तुझ्याच मध्ये दिसते आम्हा देवाचे स्वरूप आई... सोसल्या अपार कळा तू लेकरांसाठी झटलीस फार आमचे जीवन घडवण्यासाठी आई... तू स्नेह, तू त्याग आणि तूच समर्पण मातृत्वाच्या उबदार कुशीत वासरू घाली आलिंगन आई... माया अन् ममतेचा तू अपार सागर तुझ्या पुढे फिका पडे सारा सुखाचा ही डोंगर आई... तू मनाचा धीर, तू विश्वास आणि आधार तू सोबत असताना दुःख ही होतील कडेकपार आई... तुझविन आम्हांस खरच गं कोणी नाही