मालिका....आयुष्यातल्या अनुभवांची - 7

  • 3.9k
  • 2k

पान ७      आता आमची सातवी सुरू झाली होती . पण ,आम्ही काय हॉस्टेलच्या बिल्डिंगमध्ये राहायला नव्हतो. तर , शाळेच्या Computer लॅबच्या वरच्या Room मध्ये राहायचो . त्या वर्षी होस्टेलमध्ये जास्त ऍडमिशन झाल्यामुळे आम्हाला राहायला जागा नव्हती . त्यामुळे,आम्हाला शाळेच्या Computer लॅब च्या वरच्या मजल्या वरील Room दिली होती .त्यामुळे आमच्याकडे लक्ष द्यायला कोणी नव्हत. याचा सगळा फायदा आम्ही त्यावर्षी करून घेतला होता .वर्गातल्या मैत्रिणींना Hostel च्या रूमवर न्यायला परवानगी नव्हती . पण ,आम्ही तेव्हा मैत्रिणींना घेऊन यायचो. मी सातवीत असताना आम्हाला राजश्री नाईक या बाई वर्ग शिक्षिका  होत्या आणि  मराठी हा विषय त्या आम्हाला शिकवायच्या . एकदा चाचणी परीक्षेत