योगीनींचा बेट - भाग २

  • 3.6k
  • 1
  • 1.8k

योगीनींचे बेट भाग २योगीनिंचे बेट दुसर्या दिवशी सकाळी नाष्टा झाल्यावर मी व अशोक बाळा खोत व त्या भ्रमिष्ट झालेल्या गुराख्याच्या घरी गेलो.त्यांच्या कुटुंबियांकडून फारशी माहिती कळली नाही.मग आम्ही आमचा मोर्चा कातळ शिल्पंकडे वळवला. वर पोहचल्यावर मी सर्वत्र नजर फिरवली.सगळीकडे शांतता होती मंद वरा होता.वाळू काढणारी होडकी खाडी परिसरात दिसत होती." अशोक ,तू यातल्या प्रत्येक शिल्पाचा जवळून फोटो घे" मी अशोकला सुचवले.मी प्रत्येक शिल्पं बारकाईने न्याहाळत पुढे सरकत होतो.माझ्या टिपण वहीत टिपण काढत होतो.त्यातल्या वेगळेपणाची नोंद घेत होतो.मी त्या अवकाशयाना सारख्या दिसणाऱ्या आकृतीकडे पोहचलो.त्याचे खालचा ,मधला व वरचा तीन भाग पडत होते. कदाचित वरच्या भागात अवकाश यात्री बसत असावेत.अर्थात त्याची आतली