स्पर्शबंध.. जुळले मन बावरे ? - 13

  • 4.9k
  • 3.3k

मीरा झोपलेली बघताच मिष्टिने तिच्या कपाळावर ओठ टेकवले.विरजची वाट बघत बघत तिला बसल्याबसल्याच कधी झोप लागली हे कळलच नाही..................रात्री 2 वाजता विराज रूम मध्ये आला..... त्याने पाहिलं कि मिरा मिष्टी ला एकदम घट्ट पकडून झोपली होती..........मिष्टी बसल्या बसल्याच झोपली होती..... मीरा तिच्या मांडीवर डोक ठेवून तिला घट्ट बिलगून झोपली होती.त्यांच्याकडे बघून कोणालाही वाटणार नाही की त्या सख्ख्या मायलेकी नाहीयेत.मिष्टी अजूनही सकाळच्या साध्याच साडीत होती......अर्धे केस वर लटकवलेले होते तर अर्धे खाली आले होते झोपेत आणि त्यात तिच्या त्याला आवडणाऱ्या चुकार बटा तिच्या चेहऱ्यावर आल्या होत्या..... विराजला त्या बटा सावरायचा मोह आवरताच आला नाही.....तो हळूच पुढे आला आणि तिच्या बटा कानामागे