प्रीत तुझी माझी.. पर्व -१ - (भाग : ५ अंतिम)

  • 4.2k
  • 2.2k

प्रीत तुझी माझी भाग - ४ पासून पुढे.. सर्व वाचक मित्रांना माझी नम्र विनंती आहे की, जर कुणी या कथेचा हा भाग पहिल्यांदाच वाचत असाल तर, या कथेचे आधीचे चार भाग नक्की वाचा. धन्यवाद ====================================== आता वेळ होती सप्तपदींची. समोर एका पाटावर एका ओळीत सात सुपाऱ्या थोडे तांदुळ ठेवून त्यावर ठेवलेल्या होत्या. बाजूला एका छोट्या होमकुंडात धगधगता अग्नी प्रज्वलित करून ठेवला होता. गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे दोघांनी एकमेकांचा हात हातात धरला. आणि सप्तपदी सुरु झाल्या. ते जसे सप्तपदी चालत होते तसे गुरूजी त्या दोघांना प्रत्येक पाऊलांचा अर्थ समजावून सांगत होते. आणि प्रत्येक पावलानंतर तिला एक सुपारी तिच्या उजव्या पायाच्या अंगठ्याने