My Cold Hearted Boss - 6

  • 5.8k
  • 1
  • 3.6k

" गुड नाईट बॉस... उद्या भेटू.. ", तो तिला ग्रीट करत म्हणाला... तसं तीने मान डोलावली... तो तसाच खुशीत निघून गेला... ती मात्र त्याला जाताना पाहत होती........ दुसऱ्या दिवशी सकाळी आदित्यची आई त्याला टिफिन बनवून देते...दोघांसाठी..!!आदित्य तोच डब्बा घेऊन जातो... पण मनात वैतागलेला असतो... त्याच्या बॉसला...!!तो येतो आणि त्याच्या डेस्क वर बसतो... वेदांशी अजून आली नव्हती... तिला अर्धा तास वेळ लागणार होता.. तसं त्याने त्याचं सगळं सामान त्याच्या डेस्क वर नीट रचून ठेवले.. आणि त्याच्या कामाला सुरवात केली... सगळे एम्प्लॉयी हळू हळू येत होते... पण आज सगळ्यांच्या चेहऱ्यावर भयानक भीती होती...!कारण आज तर सगळ्यांना प्रेसेंटेशन द्यायचे आहे.. आणि जर चुकलो