इ व्हि एम वर शंका ; करु नये? इ व्हि एम मशीन. इ व्हि एम मशीन सध्या वादात सापडलेली असून पराभवी होणारे उमेदवार इ व्हि एमवर ताशेरे ओढतांना दिसतात. म्हणतात की इ व्हि एम ही एक यंत्रणा असून ती केव्हाही हॅक करता येते. त्यासाठी त्यात बेगासस नावाचा खुपिया व्हायरस टाकावा लागतो. बस, काम फत्ते. असं काही लोकांचं म्हणणं. मग त्यात असा बेगासस व्हायरस टाकल्यानं मशीन आपोआपच हॅक करुन त्यात नोंदवलेलं मतदान हे संबंधीत पक्षाला जावू शकते व ते निवडून येवू शकतात असं काही लोकांचं म्हणणं. त्यावर आधारीत तसा लोकांचा विश्वास त्या मशीनवर बसावा, म्हणून त्यात व्हि व्हि पॅडची योजना आली.