पुराणातील गोष्टी - 1

  • 11.6k
  • 4.7k

पुराणातील गोष्टीभुगोलसूर्य, चंद्र , राजवंशाची माहिती ऐकल्यावर ऋषींनी रोमहर्षणा ना विनंती केली की आम्हांला जगाच्या भूगोला बद्दल सांगा. रोमहर्षण म्हणाले पृथ्वी ७ द्विपांमधे विभागली आहे. त्यांची नावे जंबुद्विप, प्लक्शद्विप, शाल्मली द्विप, कुशद्विप, क्रौंच द्विप, शाक द्विप आणि पुष्कर द्विप. ही द्विपे सात समुद्रांनी वेढली आहेत. ते समुद्र म्हणजे लवण, इक्शु, सुर, सर्पी, दधी, दुग्ध, जल.जंबुद्विप हे मध्य भागी आहे. व त्याच्या बरोबर मधे सुमेरू पर्वत आहे. सुमेरूच्या दक्षिणेला हिमवन, हेमकुट, निषाद पर्वत आहेत. उत्तरेला नील, श्वैत, श्रींगी पर्वत आहे. जंबुद्विप काही प्रदेशात विभागले आहे. त्याना वर्ष असे म्हणतात. इलावृत वर्ष,भरत वर्ष, भद्र वर्ष, केतुमल वर्ष, हरी वर्ष, रम्यक वर्ष, हिरण्मय,