थोडंसं मनातलं..!

  • 6.9k
  • 2.4k

आज तब्बल दोन ते अडीच वर्षांनी पुन्हा काहीतरी लिहायला सुरुवात करत आहे. या दोन ते अडीच वर्षांत आयुष्यात खूप काही महत्वाच्या घटना घडल्या. धावपळीच्या जीवनातून म्हटलं थोडा वेळ काढू आणि तुमच्याशी आज संवाद साधूया.इंजिनीअरिंग झाली आणि मी जॉब च्या शोधतच होते, की तितक्यात कोविड सुरू झाले. त्यामुळे जॉब शोधणे थोडे कठीण होऊ लागले. सगळे घरीच बसले होते मग घरातल्यांसोबत वेळ खूप छान जाऊ लागला. नवनवीन पदार्थ करून खाऊ लागलो आणि ऑनलाईन ॲप्सवर पोस्ट करून नातेवाईकांना दाखवू लागलो. गप्पा रंगू लागल्या. घरातल्या घरात बस