कर हर मैदान फते

  • 3.5k
  • 1.2k

             आयुष्य ही एक रणभुमी आहे. येथे प्रत्येक जण स्वत:च्या अस्तित्वाची लढाई लढत आहे. खरी लढाई ही आयुष्यभर चालूच असते. पण तरुणपणात जास्त ताकदीने लढावं लागतं. म्हणजे उतारवयात जास्त लढण्याची आवश्यकता राहत नाही.             आजचा तरुण अनेक संकटांशी लढत आहे. आजचं युग हे स्पर्धेचं युग आहे. हे वाक्य आपण नेहमी ऐकतो. तसं पाहिलं तर पहिली लढाई ही आपली स्वत:शीच असते. आपल्यातील दुर्गुणांशी असते. त्यांच्यावर मात केल्याशिवाय आपण यशस्वी होऊ शकत नाही. आजचे तरुण हे मेंढयांच्या कळपासारखे एकाच क्षेत्रामध्ये जाण्याचा प्रयत्न करत आहेत. जसे पुर्वी डी.एड. ला मार्केट आले होते. त्यावेळी सर्वचजण डी.एड.कडे वळले. नंतर इंजिनिअरींग