बिबटया

  • 2.8k
  • 855

बिबटया गेल्या महिनाभरापासून बालाघाटाच्या डोंगररांगेत व परिसरात बिबटया आल्याची जोरदार चर्चा सुरु होती. बहरात आलेल्या ‍पिकांना ‍दिवसा लाईट नसल्यामुळे रात्री पाणी देण्यासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये ‍ भितीचे वातावरण होते. एकाला दुसरा सोबत असल्या ‍ शिवाय कोणी शेतामध्ये जात नव्हते. शेतात राहणारी माणसं बिबटयाच्या दहशतीने जीव मुठीत धरुन राहत होती. शेजारच्या तालुक्यातील गावांमध्ये बिबटयाने शेतात काम करणाऱ्या बायांवर, माणसांवर हल्ला केल्याच्या घटना वर्तमान पत्रातून प्रसिद्ध होत होत्या. हिवाळयाचे दिवस असल्याने सकाळी लवकर उठून व्यायामाला जाणारे पोरं बिबटयाच्या दहशतीने व्यायामाला जात नव्हते. तरुण मुले बिबटयाचा फोटो व त्या खाली भाऊंची गावात जोरदार एन्ट्री अशी टॅग लाईन लावून व्हॉटसअपला स्टेटस ठेवत होती. बिबटयाला शोधण्यासाठी