मोबाईल

  • 3.1k
  • 990

             आजपर्यंत अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या मुलभुत गरजा होत्या. पण या गरजांमध्ये एक मुलभुत गरज म्हणून मोबाईलचाही समावेश करावा लागेल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. कारण माणसाला सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत मोबाईल जवळ लागतो. मोबाईल जरासा जवळ नसेल तर माणूस बेचैन होतो. एवढंच काय बऱ्याच लोकांना सकाळी टॉयलेटमध्ये मोबाईल जवळ नसेल तर त्यांचे पोट साफ होत नाही. मोबाईलची बॅटरी उतरली तरी माणूस बेचैन होतो.             पुर्वी माणसाची नाळ गावाशी, नात्यांशी आपल्या माणसांशी जोडलेली असायची आज मोबाईलशी जोडली आहे. भावना मोबाईलशी जोडल्या गेल्या आहेत. वेगवेगळया भावनांचे इमोजी देखील मोबाईलवर उपलब्ध आहेत. माणसं मोबाईलने जेवढी