नशीब©️®️शिल्पा सुतारसतीश हताशपणे ऑफिसच्या खुर्चीवर बसला होता. तिथे तो आज इंटरव्यूसाठी आला होता. थोड्या वेळापूर्वी तिथल्या रीसेपशनिस्टने सिलेक्टेड लोकांची लिस्ट वाचून दाखवली. त्यात त्याच नाव नव्हतं. नेहमीच आहे हे. काय लिहिल आहे माझ्या नशिबात ते समजत नाही. सगळीकडे नकार. तो उठला. रीसेपशन जवळ गेला. "मॅडम काय प्रॉब्लेम आहे. माझ शिक्षण या पोस्टसाठी सगळ्यात जास्त आहे. अपेक्षा ही विशेष नाही." "तुम्हाला अनुभव नाही, म्हणून घेतल नाही." "कोणीतरी काम करायचा चान्स द्यायला हवा ना? त्या शिवाय कसा अनुभव येईल. मी एकदा आत जावून साहेबांना भेटू का?" " सॉरी सर. तुम्ही आमचा वेळ घेत आहात. तुम्ही जावू शकता."तो बाहेर आला. टपरीवर उभ राहून