मला स्पेस हवी पर्व १ - भाग ६१

  • 2.1k
  • 1
  • 909

मला स्पेस हवी पर्व १ भाग 61   मागील भागात आपण बघीतलं की नेहा कोणत्या विचारात गुंतली असेल हा विचार अनुराधाच्या मनात चालू होता. आता पुढे बघू.     नेहाला सरळ विचारण्याची हिंमत अनुराधा मध्ये नव्हती. नेहा सारख्या सुशिक्षित, प्रेमळ स्त्रीला आयुष्याचा वैताग यावा इतका त्रास कशाचा असेल? आजपर्यंत आपण नेहमीच मॅडमना हसतमुख बघीतलं. इतक्या हस-या चेहे-यामागे दु:ख असू शकतं? वैताग येण्याइतके?   माणसाला कधी कुठली गोष्ट त्रासाची वाटेल सांगता येत नाही. खरंच आहे कोणाच्या आयुष्यू कुठला रंग भरला असेल आणि कुठला रंग त्याला त्रास देत असेल कळत नाही.   आपण एवढी पुस्तक वाचतो त्या पुस्तकातून किती वेगवेगळे रंग वाचायला