मला स्पेस हवी पर्व १ - भाग ६०

  • 2.1k
  • 960

मला स्पेस हवी पर्व १ भाग 60     मागील भागात आपण बघीतलं की रमणने नेहाजवळ आपल्या मनातील भावनांची कबुली दिली.नेहा अचंबित झाली. आता पुढे     त्यादिवशी नेहा कडे दोन दिवसासाठी अनुराधा मॅडम येणार होत्या. त्यावेळेस अपर्णा आपल्या घरी जाऊन परत येणार होती. नेहा मॅडमचा चहा बिस्कीट झाल्यावर अपर्णांनी ब्रेकफास्ट तयार करून ठेवला आणि नेहा जवळ तिच्या खोलीत आली ,     “मॅडम आज मी घरी जाते आहे. थोड्यावेळाने अनुराधा मॅडम येतील.त्या दोन दिवस थांबणार आहेत.”   “ कशाला त्यांना त्रास देतेस? मला तर बरं वाटतंय.   “नाही मॅडम तुम्हाला अजून पूर्णपणे बरं वाटत नाही. तुमचा थकवा गेलेला नाही.