मला स्पेस हवी पर्व १ - भाग ४९

  • 2.4k
  • 1.2k

मला स्पेस हवी पर्व १ भाग ४९मागील भागात आपण बघीतलं की नेहा सांत्वनासाठी येणाऱ्या पाहुण्यांच्या वागणुकीने कंटाळली आहे. आता सहा महिन्यांनंतर काय घडतंय. नेहा कशी आहे .सुधीर , नितीन आणि निशांत कॅंटीनमध्ये जेवायला बसले होते. सुधीर जरा गप्प गप्पच होता.“सुधीर काय झालं?”“काही नाही. सगळं विस्कटत चाललंय.”“विस्कटत चाललंय म्हणजे काय?”नितीनने गोंधळून विचारलं.“प्रियंका गेल्यानंतर या येणाऱ्या पाहुण्यांमुळे वैताग आला होता.”“ते तर तू सांगीतलं मागेच.आता काय झालं?”नितीन म्हणाला.“तेव्हा नेहाचं जे बिनसलं होतं ते अजूनही बिनसलच आहे.”“म्हणजे नेमकं काय बिनसलं? आम्हाला समजेल अशा भाषेत सांगशील का?”निशांतने बराच वेळाने सुधीरला विचारलं.“प्रियंकाच्या आजारपणातही नेहा आपल्या विचारांवर ठाम होती. आईबाबांना आपणच सावरायचं आहे यावर ती इतकी ठाम