नयना आणि विशाल दोघेही एकमेकांचे खूप चांगले मित्र होते. कॉलेजपासून दोघेही एकत्र होते. अभ्यास असो, कॉलेजच्या सहली किंवा वार्षिक स्नेहसंमेलन, काहीही असो दोघे नेहमी एकत्रच असायचे. दोघांमध्ये एक वेगळच बॉंडिग तयार झालं होतं. हळूहळू नकळतच मैत्रीच रुपांतर कधीतरी प्रेमात होत गेलं. खरंतर दोघंही एकमेकांना खूप आवडत तर होते पण स्वताःहून बोलायला कोणीच तयार नव्हते. त्याला उगाचंच वाटायचं की, तिला आपल्या मनातला सारं समजलं तर ती दोघांत असलेली मैत्री सुध्दा तोडून टाकेन. आणि इकडे तिला वाटायचा की मी स्वतःहून विचारलं तर तो म्हणेल की आजकालच्या मुली खूपच मॉडर्न आहेत. उगाचच कहीसा गैरसमज होईल दोघांमध्ये. दोघेही आपल्या मनात विचारांचे घर बांधत होते.