मला स्पेस हवी पर्व १ - भाग ४५

  • 2.5k
  • 1.3k

मला स्पेस हवी पर्व १ भाग ४५मागील भागात आपण बघीतलं की प्रियंकाने या जगाचा निरोप घेतला. या गोष्टीला आता महिना उलटला आहे. आता दोन्ही कुटुंबांमध्ये कशी परीस्थिती आहे ते बघू.निरंजन बाल्कनीत बसला होता. एकटाच कुठेतरी शुन्यात दृष्टी लावून बसला होता. खोलीच्या दाराशी निरंजनचे बाबा उभे होते. मुलाची अशी अवस्था बघून बापाचं हृदय कळवळलं. त्यांना निरंजनचं सांत्वन करण्यासाठी शब्दच सापडत नव्हते.त्याची आयुष्याची जोडीदार असलेली प्रियंका अकाली त्याचा हात सोडून निघून गेली होती. निरंजनने जिच्या बरोबर सप्तपदी चालली, जिचा हात धरुन त्याने ‘नातीचरामी’ म्हटलं तीच अचानक निरंजनला असं सोडून निघून गेली. प्रियंका अशा वाटेने गेली आहे की ती पुन्हा परतच येऊ शकणार