मला स्पेस हवी पर्व १ - भाग ४०

  • 2.6k
  • 1.4k

मला स्पेस हवी पर्व १ भाग ४०मागील भागात आपण बघीतलं की प्रियंकाचं पहिलं समुपदेशनाचं सेशन झालं.आता हिची काही केमोथेरपी झाल्या आहेत.समुपदेशनाची काही सिटींग झाली आहेत. आता पुढेप्रियंका कितीतरी वेळ आरशासमोर उभी राहून स्वतःला निरखत होती. केमोथेरपीमुळे तिचे बरेच केस गेले होते. डोळ्याखाली काळी वर्तुळे आली होती. त्वचेचा रंग काहीसा भुरकट झाला होता. त्वचा निस्तेज दिसत होती. रोज स्वतःचं रूप आरशात बघून प्रियंकाला रोज आपल्या चेहऱ्यावर नवीन बदल दिसायचा आणि तिला धक्का बसायचा. तिचे डोळे वाहू लागायचे पण त्याबरोबर तिचं दुःख वाहून जात नसे उलट अजून तीव्र होत असे.खोलीत येता येता निरंजनने प्रियंकाला आरशासमोर ऊदासपणे उभी राहून रडताना बघीतलं तशी त्याच्या