मला स्पेस हवी पर्व १ - भाग ३४

  • 3.1k
  • 1.7k

मला स्पेस हवी पर्व १ भाग ३४मागील भागात आपण बघीतलं की सुधीरचं नितीन आणि निशांत सांत्वन करतात.पुढे बघू.आज ऑफीसमध्ये नेहाचं कामाकडे अजीबात लक्ष लागत नव्हतं. प्रियंकाच्या आजारपणाबद्दल कळल्या पासून तिला प्रियंकाशी आपलं असलेलं सुंदर बाॅंडीग आठवलं. नेहा लग्न होऊन आली तेव्हा प्रियंका 'वहिनी वहिनी' करत नेहाच्या सतत पाठीमागे असायची. नेहा सव्वीस वर्षांची तर प्रियंका तेवीस वर्षांची. दोघींमध्ये तीनच वर्षांचं अंतर असल्याने काही दिवसातच नेहा आणि प्रियंकाची छान गट्टी जमली.प्रियंकाच्या मोकळा आणि हसरा स्वभाव नेहाला खूप आवडला. नणदेची भीती वाटावी अश्या प्रकारचा स्वभाव प्रियंकाचं नसल्याने नेहाचीपण ती लगेच लाडकी झाली.प्रियंकाशी नेहाचं नातं जे मोकळं आणि निर्मळ होतं तसंच नातं नेहाचं प्रणालीशीपण