मला स्पेस हवी पर्व १ - भाग ३२

  • 3.1k
  • 1.9k

मला स्पेस हवी पर्व १ भाग ३२मागील भागात आपण बघीतलं की प्रियंकाला कॅंन्सर झालाय आणि तो शेवटच्या स्टेजला आहे.सकाळ होताच सगळे उठले. खरंतर उठले म्हणणं योग्य नाही. उठण्यासाठी आधी झोपावे लागते. प्रियंकाला कॅंन्सर झालाय हे कळल्यावर रात्रभर सगळेच खूप ताणात होते. त्यामुळे झोपेचं गलबत त्यांच्या डोळ्याच्या किना-यापर्यंत पोहचलच नाही. सगळे टक्के जागे होते.सकाळी सुधीरच्या आईने बाबांना विचारलंं," कधी जाऊया प्रियंका कडे.?""थोड्यावेळाने.""आज अंगातलं त्राण गेलय. अंगातली सगळी शक्ती कोणीतरी ओढून नेली आहे असं वाटतं आहे.""खरय तुझं. बोलायची सुद्धा इच्छा नाही ग."सुधीरचे बाबां म्हणले."हं. प्रियंका तर कोलमडली असेलच. निरंजनचीपण काय अवस्था झाली असेल?'काहीच कळत नाही. सुधीरला हाक मार.""हो."म्हणत सुधीरची आई उठली. ऊठण्यासाठी