मला स्पेस हवी पर्व १ - भाग २५

  • 3.3k
  • 2.1k

मला स्पेस हवी पर्व १ भाग २५मागील भागात आपण बघीतलं की सुधीरच्या आईला प्रियंकाची आठवण आली सगळा भूतकाळ तिच्या डोळ्यासमोर उभा राहिला. या भागापासून आपण जरा भूतकाळात डोकावणारी आहोत.आज नेहाच्या घरी चहापोह्यांची गडबड सुरू होती. नेहाला खरंतर असं टिपीकल बघण्याचा कार्यक्रम करायचा नव्हता पण नेहाची आई शिस्तीत चालणारी असल्याने नेहाचं तिच्यापुढे आपला नकार दामटता आला नाही.नेहाने शेवटी वडिलांकडे धाव घेतली.ही मागच्या आठवड्यातील गोष्ट आहे."बाबा मला हे दाखवून घेणं म्हणजे स्वतःचं प्रदर्शन मांडल्यासारखं वाटतं.""बेटा तुझ्या आईने हा कार्यक्रम ठरवला आहे तेव्हा मी याबाबतीत तुझी काही मदत करू शकत नाही.""हे काय बाबा मी तुमची लाडकी आहे नं!""हो. हे तर सूर्यप्रकाशा इतकं स्वच्छ