मला स्पेस हवी पर्व १ - भाग २३

  • 3.5k
  • 2.3k

मला स्पेस हवी पर्व १ भाग २३मागील भागात आपण बघीतलं की सुधीरचा फोन येतो.आज बघू ऋषीशी नेहा बोलतेय का?लंचटाईम झाला तसं अपर्णाने नेहाला फोन केला. आपल्या टेबलावरचं आवरून ड्राॅवरला कुलूप घालत असतानाच अपर्णाच्या फोन आला," मॅडम लंच टाईम झाला."" हो निघुया.""ठीक आहे.मी येते."नेहा आणि अपर्णा दोघी कॅंटीनमध्ये गेल्या."मॅडम तुम्हाला आवडतो तसा रस्सा आणलाय आज मी.""स्कुटीने येतेस नं ?रस्सा भाजी आणलीस डब्यात?""हो ""अगं तू टूव्हिलरने येतेस तर डबा हिंदकळत नाही?""मी डिकीत ठेवते. डब्याच्या बाजूला भक्कम पॅकींग देते. मी नेहमी डबा तसाच आणते.""मागच्या वेळी मी तू आणलेला रस्सा खाण्यातच इतकी मग्न झाले होते की रस्सा भाजी डब्यात कशी आणलीस हे विचारायची विसरूनच