मला स्पेस हवी पर्व १ भाग २२मागील भागात आपण बघीतलं की ताम्हाणे सरांनी नेहाच्या मांडलेल्या कल्पना संचालक मंडळाला आवडल्या आहेत. नेहाला आज मिटींगमध्ये तिच्या कल्पना सविस्तर मांडायच्या आहेत. बघू आजच्या भागात काय होईल.नेहा सकाळी ऑफिसला पोचली.ती जेमतेम आपल्या जागेवर येऊन बसली आणि इंटरकाॅम वाजला.नेहाने घाईने आपली पर्स टेबलवर ठेवून फोन उचलला." गुड मॉर्निंग सरगुड मॉर्निंग आज तुम्हाला संचालक मंडळासमोर तुमच्या कल्पना सविस्तर मांडायच्या आहेत. लक्षात आहे नं?"हो सर.""तयारी झाली का?"" हो सर.""तुमची ही पहिलीच वेळ आहे संचालक मंडळासमोर जाण्याची. तुम्ही सगळी तयारी व्यवस्थीत करून त्यांच्या समोर तुमच्या कल्पना मांडल्या तर तुमचही चांगलं इम्प्रेशन पडेल.""हो सर. किती वाजताची वेळ ठरली?""अकरा वाजता