मला स्पेस हवी पर्व १ - भाग १९

  • 3.9k
  • 2.5k

मला स्पेस हवी पर्व १ भाग १९ मागील भागात आपण बघीतलं की सुधीरने आई बाबांना नेहाच्या बंगलोरला जाण्यामागचं खरं कारण सांगितलं. आता नेहा बंगलोरला काय करतेय ते बघू.नेहाला बंगलोरला येऊन साधारणतः दहा दिवस झाले असतील. तिच्याकडे टूरप्लॅनींगबरोबर जाहीरात विभाग पण असल्याने दोन्ही विभागातील मुख्य व्यक्तींशी तिची ओळख आणि दोन्ही विभागातील कामाच्या गती बद्दल माहिती करून घेतल्यावर आज तिने जाहिरात विभागाची अपर्णा आणि टूरप्लॅनींगमधील राजेशला आपल्या केबीनमध्ये बोलावलं.ते दोघंही नेहाच्या केबीनमध्ये यायला आणि नेहाचा फोन वाजायला एकच गाठ पडली. तिने मोबाईलच्या स्क्रीनवर तिच्या आईचं नाव वाचूनही तिने फोन घेतला नाही. अपर्णा आणि राजेश दोघंही तिच्या समोरच्या खुर्चीवर बसले." गुड मॉर्निंग मॅडम.""