मला स्पेस हवी पर्व १ - भाग १८

  • 3.8k
  • 2.5k

मला स्पेस हवी पर्व १ भाग १८मागील भागात आपण बघीतलं की सुधीर आईबाबांना नेहाचं बंगलोरला जाण्यामागचं खरं कारण सांगतो. तेव्हा त्यांना धक्का बसतो.आता काय होईल बघू.सुधीरचे आईबाबा झोपायला आले खरे पण दोघंही अस्वस्थ असल्याने त्यांना झोप येत नव्हती. " अहो आपलं काही चुकलं का? "" कशाबद्दल विचारते आहेस?"बाबांनी काही न कळून विचारलं." अहो असं काय करता. मी नेहाबद्दल बोलतेय. ती अशी का निघून गेली?"' हे बघ आपण सासुसासरे म्हणून आपण तिच्यावर कोणताही अन्याय केला नाही. आपण तर तिला प्रियंकाच्या जागी मानत होतो. नेहाचे आईबाबा जसे तिच्याशी वागतील तसचं वागण्याचा आपण प्रयत्न केला. म्हणून तर तुमच्या दोघींचं गुळपीठ झालं."" अहो हो