मला स्पेस हवी पर्व १ - भाग १४

  • 4.7k
  • 3.1k

मला स्पेस हवी भाग १४मागील भागात आपण बघीतलं की नेहाला सुधीरच्या बाबांचा फोन आला होता . बघू नेहा फोन उचलते का?" हॅलो बाबा बोला ."" अगं कशी आहेस? पोचलीस नं व्यवस्थित?"सुधीरच्या बाबांनी नेहाला विचारलं."हो पोचले. हाॅटेलही छान आहे."सुधीरच्या बाबांनी अजून काही प्रश्न विचारू नये म्हणून आधीच नेहाने हाॅटेल बद्दल सांगितलं." हो का. बरं. हे घे ऋषीशी बोल.""हॅलो आई तू कशी आहे?"ऋषीचा गोड आवाज कानावर पडताच नेहा थोडीशी हळवी झाली."मी छान आहे.""आई मी आजी आजोबा आणि बाबांना त्रास देत नाही.""वा! छान.""आई तू काल घाबरली नाही नं?"ऋषीच्या आवाजात नेहाला तिच्या बद्दल काळजी जाणवली."नाही.""आज नं माझी एक्झाम झाली.""हो का! ""हो. आई परवा स्पीच