मला स्पेस हवी पर्व १ - भाग १२

  • 5k
  • 3.5k

मला स्पेस हवी भाग १२मागील भागात आपण बघीतलं की नेहा सुधीर आणि ऋषीला बसस्टॅंडवर यायला नाही म्हणते. बसस्टॅंडवर आलेल्या अक्षय आणि आईशीपण नेहा नीट बोलत नाही आता काय होईल पुढे बघू.बस बंगलोरला निघाली नेहाला आई आणि अक्षय दिसले पण एसी बस असल्याने काचा बंद होत्या त्यामुळे तिला ते दोघं दिसले पण त्यांना नेहा दिसली नाही.बस काही अंतर पुढे आल्यावर नेहाने डोळे मिटून घेतले. ती स्लीपरकोचने चालली होती आणि तिने सिंगल बर्थचं तिकीट काढलं असल्याने ती बर्थवर एकटीच होती. तिने डोळे मिटले पण झोप तिच्या डोळ्यात शिरायला तयारच नव्हती. झोपे ऐवजी राहून राहून सुधीरच तिच्या डोळ्यासमोर येत होता. सुधीरची केविलवाणी नजर