मला स्पेस हवी पर्व १ भाग ८ मागील भागात आपण बघीतलं की नेहाने तिच्या आईला सांगितलं पण तिला काही पटलं नाही.आता काय होईल या भागात बघू. नेहाने काल ऑफीसमध्ये ती प्रमोशनवर बंगलोरला जायला त्या आहे हे सांगितल्यामुळे ती आता बंगलोरला जाण्याची तयारी करण्यात गुंतली. ती जाणार म्हणून घरात ज्या अस्वस्थ हालचाली सुरू होत्या त्याकडे कळूनही नेहाने दुर्लक्ष केलं. तिला आता यात गुंतायचं नव्हतं. हे सगळे पाश तिला नकोसे झाले होते. जेवणाच्या टेबलावर आता कमालीची शांतता असायची. सगळे जेवायचे पण जेवताना प्रत्येक जण आपल्या विचारात असायचा. नेहा त्यांच्या बरोबर जेवायला असायची पण त्रयस्थपणे जेवायची. जेवताना निरागसपणे ऋषी नेहाशी बोलायचा प्रयत्न करायचा.