मला स्पेस हवी पर्व १ - भाग ४

  • 5.6k
  • 4k

मला स्पेस हवी भाग ४- मागील भागात आपण बघीतलं की रंजना नेहाची मैत्रीण तिला समजवायचा प्रयत्न करते पण नेहा तिचं म्हणणं ऐकून घेत नाही.पुढे काय होईल बघू. रात्री जेवताना शांतता होती. ऋषीची बडबड चालू होती पण एरवी सारख्या गप्पा रंगत नव्हत्या. सुधीर आणि नेहा दोघेही गप्प गप्प होते. सुधीरच्या आईने नजरेने सुधीरच्या वडलांना या दोघांना काय झाले विचारलं. त्यांनी मान माहीत नाही अशी हलवली .शेवटी सुधीरची आई बोलली, "काय आज जेवताना मौनव्रत घेतलंय का दोघांनी?" आईच्या बोलण्याकडे सुधीरचं लक्ष नव्हतं "नेहा काय झालं? आज तुम्ही दोघंही शांत शांत आहात? वादावादी झाली का दोघांमध्ये?" "नाही. आई रोजच्या सारखंच तर बोलतेय मी."