मुलगी होणं सोपं नाही - 10 - आनंद..

  • 1.8k
  • 647

२ वर्षांनंतर....चिऊ... चिऊ... उठ बाळा सकाळ झाली बघ...उठ आणि दात घासून अंघोळ करून घे... मी तोपर्यंत आपल्यासाठी नाश्ता बनवते. हो ग् ताई.. उठते.., मी डोळे चोळत म्हणाली..ताई नी छान दोघिंसाठी भाकरी आणि बेसन बनवलं होत. 'माई'... बाईसोबत गेल्यानंतर बऱ्याच दिवसांनी आम्ही दोघी आधी सारखे राहत होतो. ताई.. चिऊ.. काय करता ग..?? उठलात का ग पोरींनो??हो उठलोय ना काकू.. या ना.. अगं काही नाही.. मी विचारत होती, मी आज गावात लग्न आहे ना तिकडे जाणार आहे, येता का तुम्ही दोघी ?? आज चिऊ ला शाळेला सुट्टी पण असेल ना???हो, आहे ना.. चिऊ ला शाळेला आज सुट्टी.. पण काकू लग्नाला आम्ही दोघी