किमयागार - 33

  • 2.1k
  • 927

किमयागारतरुण म्हणाला, मला आत्ता तरी खजिना सापडला आहे असेच वाटते. माझ्याकडे उंट आहेत, माझ्याकडे क्रिस्टल दुकानात मिळवलेले पैसे आहेत आणि पन्नास सोन्याची नाणी आहेत. माझ्या देशात तर मी श्रीमंत माणूस समजला जाईन.‌ किमयागार म्हणाला पण यातले काही पिरॅमिड मुळे मिळालेले नाही. तरुण म्हणाला, मला फातिमा मिळाली आहे ती पण एखाद्या खजिन्यासारखीच आहे. ते आता शांतपणे जेवण करत होते. किमयागाराने एक बाटली उघडली व त्यातील लाल पेय तरुणाच्या ग्लास मध्ये ओतले. तरुणाने आतापर्यंत चाखलेल्या वाईनमधील ही सर्वात छान वाईन होती. तरुण म्हणाला, इथे वाईनला बंदी आहे ना ?. किमयागार म्हणाला, " माणसाच्या तोंडातून आत जाते ते वाईट नसते, तर माणसाच्या तोंडातून