"बऱ्याच दिवसांचा हा फ्लॅट बंद होता न म्हणून असा वास येत असणार " सुमित कसतरी हसत म्हणाला."अं हो, बरोबर आहे." आत्या आणि श्वेता नाकावरचा हात घट्ट करत म्हणाल्या."पण सुमित, ती लिफ्ट मधली बाई आपण आपला फ्लॅट 1002 आहे असे म्हंटल्यावर अशी विचित्र नजरेने आपल्याकडे का बघू लागली कुणास ठाऊक?" आत्या."हो मलाही जरा ते ऑडच वाटलं " सुपर्णा.सुमित ही जरा विचारात पडला. ते पाहून सुपर्णा ने विषय बदलला, "चला आता रात्रीच्या जेवणासाठी काय काय पदार्थ करायचे ते सांगा ""अगं काही विशेष नको.... आपलं काहीतरी साधंच..." असं आत्या म्हणत असताना आतल्या खोलीतून श्वेता च्या जोर्रात ओरडण्याचा आवाज आला. पाठोपाठ श्वेता बाळाला घेऊन