दत्तक वारस नामंजूर:अनाथांनाही दत्तक घ्याहो *अलिकडे काही लोकांची मानसिकता असते की दत्तक मुल घेतांना एवढे पैसे पडतात. एवढे पैसे अनाथ संस्थेंनी मागायला नको. परंतू का नाही मागायचे? तुम्ही त्या दत्तक वारसांना आयुष्यभर चांगलंच सांभाळाल. याचा का भरोसा. त्यामुळंच तसं लिहून घेतलं जातं. कारण हे जीवन आहे. या जीवनात कधी उतार चढाव येतोच. त्याची शिक्षा या अनाथ मुलांना भोगावी लागू नये. म्हणून हे प्रावधान. हे प्रावधान कठीण समयी दत्तक वारस नामंजूर करण्यासाठी नाही.* "मी सुईच्या टोकावर मावेल एवढीही जमीन पांडवांना देणार नाही." अज्ञातवास पूर्ण करुन आलेल्या पांडवांना दुर्योधन म्हणाला. त्याचं क्रिष्णानं कारण विचारलं. तेव्हा दुर्योधन म्हणाला, "ही माझ्याच काकांची मुलं असतील