साहित्य संमेलनं लिहित्या हातांना बळ देवू शकतात का? साहित्य संमेलनं लिहित्या हातांना बळ देवू शकतात का? असा जर कोणी प्रश्न केल्यास त्याचे उत्तर नाही असे येईल. कारण अलीकडील संमेलनं ही अशाच धरणीवर होत आहेत. अलीकडं संमेलनं भरतात. त्या संमेलनाला खर्च लागतो. तो खर्च काढण्यासाठी स्मरणिका काढाव्या लागतात. त्या स्मरणिकेत प्रत्येक पानानुसार जाहिरातीचे दर असतात. त्यातच कधीकधी असे जाहिरात देणारे प्रतिनिधी भावही करीत असतात. ते भाव करतांना त्यांच्या परिचयाच्या असलेल्या लोकांना पुरस्कार द्या असे म्हणत असतात. मग ते पुरस्कार त्यालाच प्रदान होतात. ज्याची ओळख आहे किंवा जो पैसे देवू शकतो. पैशाच्या मुद्यावरुन सांगतो की अलीकडे पुरस्कारासाठीही पैसे मोजावे लागत आहेत. आम्हाला