आधार कादंबरी भाग दोन गुरुला आठवत होता तो गतकाळातील प्रसंग. ज्यावेळेस त्यानं विनोद केला होता व त्यानंतर त्याच्याच जीवनाचा विनोद झाला होता. कारण तसा विनोद जरी त्यानं कोणाला उद्देशून केला नसला तरी ती गोष्ट ज्या मुलीसोबत केली होती. तिचं मन दुखावलं गेलं होतं. ज्यातून ती त्याला वाईटच बोलली होती. विनोद हा कोणाला केव्हा दुखवेल ते काही सांगता येत नाही. विनोद जो करतो, त्याचा कोणाला दुखविण्याचा हेतू नसतोच आणि तो कुणाला दुखवत नाहीच. त्याचा एकमात्र उद्देश असतो, ते केवळ इतरांचं मनोरंजन करणं. परंतु नाण्याला जशा दोन बाजू असतात. तशाच दोन बाजू विनोदाच्याही असल्यानं ज्याच्याशी विनोद केला जातो. त्याच्या मनात नक्कीच संभ्रम