व्हि आय पी संस्कृती मोडीस निघावी आज सरकारी कार्यालयात कोण्या अधिका-याला भेटायला गेलं तर आपणाास हमखास जाणवतं की सगळ्या सरकारी कार्यालयात कुलर, एसी लागलेले आहेत. पंखे लागलेले आहेत. परंतू त्या ठिकाणी कोणीच सरकारी कर्मचारी कामावर हजर नाही. त्यातच अधिकारीही. समजा एखादा अधिकारी भेटलाच तर त्या अधिका-याची प्रत्यक्ष भेट घेता येत नाही. त्याचा एक असिस्टंट, ज्याला आपण शिपाई म्हणतो, तो बाहेर बसलेला असतो. दिवटी तास त्याची सेवा असते. असं वाटतं की तोच साहेब असावा. तो तसा वागतोही. त्याचे भाव मात्र नेहमी वाढलेलेच असतात. एखाद्या वेळी साहेबाची भेेट घ्यायची असल्यास तोच म्हणतो,, पैसे लागतील. नाहीतर थांबा. आता साहेबाची भेट घेण्यासाठी व. तिही