सरकारी नोकरी

  • 2.6k
  • 1k

सरकारी नोकरी क्रिष्णा एक सर्वसाधारण घरचा मुलगा होता. तो भोळा भाबडा होता. पण त्याचं भाग्य चांगलं होतं. त्या भाग्यानच त्याला सर्वकाही मिळत होतं. परंतू जे मिळत होतं. ते मिळत असतांना संकटही पाचवीला पुजलेली होती. क्रिष्णा लहानाचा मोठा झाला. तसा तो शिक्षणही शिकत गेला. त्याचं शिक्षण शिकणं हे अख्ख्या गावाला आवडत नव्हतं. कारण तो गरीबाचा मुलगा होता. तरीही तो शिकत गेला आणि सरकारी नोकरीपर्यंत पोहोचला. सरकारी नोकरी........त्या काळात सरकारी नोकरीला फार मोठे प्राधान्य होते. मुलींचे विवाह करतांना वधूपीते आपल्या जावयाला सरकारी नोकरीच हवी असे मानत होते. तसेच सरकारी नोकरीच्या माणसांची समाजात फार मोठी इज्जतही होती. म्हणून की काय क्रिष्णाला सरकारी नोकरी