किमयागार - 30

  • 2.2k
  • 900

किमयागार -प्रमुख ओॲसिसच्या मध्यभागी असलेल्या एका मोठ्या तंबूच्या दारात असलेल्या पहारेकऱ्यासमोर तरुण उभा राहिला व म्हणाला, मला प्रमुखांना भेटायचे आहे. मला काही संकेत सांगायचे आहेत. तो पहारेकरी काही न बोलताच तंबूत गेला आणि थोड्या वेळाने एका शुभ्र कपड्यातील तरुण अरबाला घेऊन आला. तरुणाने अरबाला त्याने काय पाहिले ते सांगितले. अरब म्हणाला, तू इथेच थांब व तो आत गेला.रात्र झाली. बाहेरच्या शेकोट्या पण हळूहळू बंद होत होत्या, सगळीकडे शांतता पसरली होती, त्या मोठ्या तंबूत प्रकाश दिसत होता. या सर्व वेळात तरुणाच्या मनात फातिमाचा विचार चालू होता. त्यांच्या भेटीत झालेले संभाषण त्याला आठवत होते आणि त्याचा अर्थ त्याला अजूनही नीट समजला नव्हता.बराच