सतरावा अध्यायश्रद्धात्रयविभागयोगअर्जुन म्हणाला हे कृष्णा ! जे लोक श्रद्धेने पुजा करतात पण त्यांना शास्त्र माहित नसते त्यांच्या मनाची स्थिती त्रिगुणांपैकी कोणती समजावी सत्व, रज कां तम ?. श्री भगवान म्हणाले, माणसाच्या स्वभावानुसार त्याची श्रद्धा असते.त्याचा जसा गुण असतो तशी त्याची श्रद्धा बनते. सात्त्विक मनुष्य देवाची भक्ति, पुजा करतो, राजस मनुष्य यक्ष राक्षसांची पुजा करतात तर तामसी भूत प्रेत आदिंची पुजा करतात. अहंकारी वृत्तीने, दांभिक पणे, काही इच्छा बाळगु शास्त्राचा आधार न घेता जर कोणी तप करीत असेल तर तो स्वत:च्या देहातील इंद्रियांना कष्ट देतो व देहात कसणाऱ्या मलाही यातना देतो. तो असुर समजावा. माणूस जे भोजन (अन्न) घेतो तेंही त्याच्या