गांधीजींना नावबोटं ठेवू नये! रणाविणं जर स्वातंत्र्य कोणाला मिळालं तर त्यात भारत देशाचा उल्लेख केला जातो.तसेच प्रथम नाव पुढे येतं. ते म्हणजे म.गांधींचं.खरंच म.गांधी थोर पुरुष होते काय? आज भारतात दोन विचारप्रवाह सुरु झाले आहेत.एक गांधीजींना न मानणारा विचार प्रवाह तर दुसरा गांधीजींना मानणारा विचारप्रवाह.काही लोकं खुल्या मनानं समर्थन करतात.तर काही लपून चोरुन.काही खुल्या मनानं नाकारतात तर काही लपूनचोरुन.पण यावरुन काही म.गांधींची थोरवी व योग्यता कमी होत नाही. आज म.गांधी चलनाच्या नोटावर आहेत.याचं कारण की ते राष्ट्रनिर्माते आहेत.देशाचे राष्ट्रपिता.काहीजण मानतही नाहीत त्यांना राष्ट्रपिता.असे लोक त्यांना चलनाच्या नोटांवरुन हटविण्याचा विचार मांडतात.मग चलनावर काय ठेवावं.तर काही लोक डॉक्टर बाबासाहेबांचं नाव सुचवतात तर