पॉवर ऑफ अटर्नी (पर्व २ रे ) भाग १०

  • 2.7k
  • 1.2k

पॉवर ऑफ अटर्नी (पर्व २ रे )   भाग १०   भाग ९ वरून पुढे वाचा  .... “ताई, आता विसरा ते सर्व. चला आपण रूम मधे जाऊ, किशोर सर तुमच्या वाटे कडे डोळे लाऊन बसले आहेत.” माधवी म्हणाली आणि मग  दोघी जणी  रूम मधे जायला निघाल्या. विभावरीच्या डोक्यांवरचं ओझं आता पूर्ण उतरलं होतं आणि केंव्हा एकदा किशोरला भेटते असं तिला झालं होतं. “त्यांना काय माहिती की मी आली आहे ते? त्यांचा तर फोनच लागत नाहीये. कोणा  जवळ आहे त्यांचा फोन?” – विभावरी. “तो बँकेत कदाचित जे नवीन साहेब आले आहेत, त्यांच्या जवळ असेल. मी उद्या जाऊन घेऊन येईन. शुद्धीवर आल्या