पॉवर ऑफ अटर्नी (पर्व २ रे ) भाग ६

  • 2.6k
  • 1.2k

पॉवर ऑफ अटर्नी (पर्व २ रे )   भाग ६    भाग ५ वरून पुढे वाचा  .... किशोर साधा माणूस होता, शाळा कॉलेज मधे सुद्धा त्याने कधी मारामारी केली नव्हती, पण आताचा प्रसंग वेगळा होता, आत्ता पर्यंत ते बदमाश बँक लुटायची गोष्ट करत होते, आणि किशोरच्या मानेवर सुरा ठेऊन एक जण उभा होता. पण आता त्यांचा विचार बदलला होता आणि ते आता माधवीला उचलून नेण्याची भाषा करत होते. किशोर विचार करत होता, काहीही झाले तरी माधवीच्या मदतीला जायलाच पाहिजे, असा त्याच्या मनाने कौल दिला. हा विचार एकदा पक्का ठरल्यावर त्याने क्षणाचाही विलंब न लावता ज्याने माधवीला पकडले होते त्याच्यावर झेप