पॉवर ऑफ अटर्नी (पर्व २ रे ) भाग ५

  • 2.7k
  • 1.3k

पॉवर ऑफ अटर्नी (पर्व २ रे )   भाग ५   भाग ४  वरून पुढे वाचा  .... रात्री विभावरी म्हणाली “किशोर काय करायचं समजत नाहीये, तू बिहार सोडून दुसरं शहर मागून बघ ना, बिहार म्हंटलं की भीती वाटते.” “विभावरी, आपण फार सुरक्षित जीवन जगतो आहोत, यात वाद नाही. पण पळपुटेपणा करून कसं चालेल? अग कसंही असलं तरी तिथेही माणसंच राहतात, हे बघ, मी तिथला नाही म्हंटल्यांवर, त्यांच्या कुठल्याही भांडणा मधे मी असणारच नाहीये, तेंव्हा घाबरण्याचं काही कारण नाही. काळजी नको कारूस. तू अमेरिकेत जा, मी बिहारला जातो आईला पुण्यातच ठेवू. जरूर पडली तर पटण्याहून पुण्याला फ्लाइट आहे, मी दोन तासात