भगवद्गीता - अध्याय १५ , १६

  • 2.3k
  • 959

भगवद्गीता अध्याय १५पुरूषोत्तमयोगमूळ वर व फांद्या खाली असलेला व ज्याची पाने म्हणजे वेद आहेत असा एक अश्वथ्थ वृक्ष आहे या वृक्षाला जो जाणतो तो वेदज्ञ जाणावा. या संसार रूपी वृक्षाचे पोषण त्रिगुण करतात. विषयांचे अंकुर फुटलेले असतात याच्या मुळ्यांचा विस्तार खाली ही होत असतो आणि या मुळ्या मनुष्याला कर्मानुसार बांधतात.या वृक्षाचे यथार्थ स्वरूप कळत नाही.याचा आदि, अंत, व आधार समजत नाही. परंतु माणसाने अनासक्ती रूपी शस्त्राने तोडले पाहिजेजिथुन परत येता येत नाही असे स्थान शोधावे व मनुष्याने या जगाचा उद्भव त्यापासून झाला त्या आदि पूरुषास शरण जावे.अभिमान व मोह यापासून मुक्त, जो अध्यात्मात स्थिर आहे, सर्व कामनांमधून सुटलेला व सुख