तुझी वाट पाहताना ..!

  • 3k
  • 1.3k

"काहीतरी मागे राहिलेय का? का मीच खूप पुढे राहिलेय! सगळ काही आहे माझ्याकडे पण मग मला चुकल्यासारख का वाटतंय? मी कोणाला विसरतेय का? हो.. मी विसरतेय कोणालातरी! ज्यांच्यासोबत मी संपूर्ण आयुष्य जगन्याची स्वप्न बगीतली होती. जी माझ्यासाठी खूप खास होती. कधी कधी होत ना असं की काही मानस आपल्या आयुष्यात येतात, तुमच्या चेहऱ्यावर हसू आणन्यासाठी. तुम्हाला नव्याने जगायला शिकवण्यासाठी आणि मग एकेदिवशी अचानक गायब होतात. एका अनोळख्या व्यक्तीसारखी. ते चेहरे.. ज्याना आपण गर्दीत शोधत असतो, ते डोळे जे आपल्याला काहीतरी सांगत असतात, ते कुठेतरी हरवून जातात. अशावेळी काय करायच असत? एखाद्या वाऱ्याच्या झुळुकीसारख त्यांच आयुष्यात येण सुकून देणार असल तरी..