किमयागार - 26

  • 2k
  • 963

किमयागार - भाषा 'प्रेमाची'. शेवटी तिथे एक तरुणी आली. तिने काळे कपडे घातले नव्हते. तिच्या खांद्यावर कळशी होती. तिचे डोके पदराने झाकले होते पण चेहरा दिसतं होता. तरुण तिच्या जवळ किमयागाराबद्दल विचारणेसाठी गेला. त्याच क्षणी त्याला काळ थांबला आहे असे वाटले. जगद्आत्म्याचा त्याच्यामध्ये संचार झाला आहे असे त्याला वाटले. त्याने तिच्या काळ्याभोर डोळ्यात पाहिले, तिचे अर्धोन्मिलित ओठ व स्मितरेषा (अर्धवट मिटलेले ओठ व हास्य ) पाहून त्याला अशा भाषेचे ज्ञान झाले, जी भाषा सर्व जगाला कळू शकते आणि जी थेट हृदयाला भिडते आणि ती भाषा म्हणजे ' प्रेमाची भाषा '. माणूसकी हून अधिक जुनी आणि वाळवंटापेक्षा प्राचीन अशी ही भाषा.