जोसेफाईन - 6

  • 5.1k
  • 3k

"अरे झोपताना तर मी बाल्कनीचे दार बंद केले होते, सुपर्णा तू उघडले होते का मी झोपल्यावर?", सुमित म्हणाला."नाही तर! मी तू झोपल्यावर लगेच झोपी गेली. काय माहित कसं काय उघडं राहिलं दार?", सुपर्णा आश्चर्याने म्हणाली."पण सुपर्णा मी तुला एक गोष्ट सांगतो हे घर काहीतरी विचित्र वाटते खरं ", सुमित"कसं काय असं वाटलं तुला ", सुपरणा"काल रात्री काय चित्रविचित्र आवाज येत होते, खिळे ठोकण्याचा आवाज, कोणाचा तरी पाय घासत चालण्याचा आवाज आणि काही वेळाने इतका घाणेरडा वास आला मला की श्वास घेणं मुश्किल झालं मला. असा अनुभव मला याआधी कुठेच आला नाही.", सुमित"मला पण काल संध्याकाळी ठोकण्याचा आवाज आणि घाणेरडा दर्प